आमच्याबद्दल

माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयामध्ये आपले सहर्ष स्वागत

school

महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य असलेली डेक्कन एज्युकेशन सोसायटी ही संस्था 24 ऑक्टोबर 1884 साली पुण्यामध्ये स्थापन झाली. तिच्या अनेक घटक संस्थांपैकी एक महत्वाची असणारी माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय ही शाळा 10 जून 1985 या दिवशी स्थापन झाली.शाळेची इमारत लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या न्यू इंग्लिश स्कूल,टिळक रोड च्या परिसरात असून पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. शाळेच्या स्थापनेवेळी तिचे नाव न्यू प्रायमरी स्कूल असे होते. त्यावेळी शाळेमध्ये इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही माध्यमाच्या शाळा एकाच इमारतीमध्ये भरत होत्या.

2007 साली दोन्ही माध्यमांच्या इमारती वेगळ्या झाल्या.येणाऱ्या काळाची पावले ओळखत संस्थेने जून 2004 मध्ये शाळेतील पाचवीपासून पुढील शिक्षणासाठी सेमी इंग्रजी माध्यम सुरू केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचा जाज्वल्य देशाभिमान विद्यार्थ्यांमध्ये उतरावा या हेतूने शाळेचे नामकरण माधव सदाशिव गोळवलकर असे करण्यात आले.2014 साली प्रशालेची शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेली पहिली बॅच बाहेर पडली.स्थापनेपासून आजपर्यंत आपल्या शाळेची यशस्वी वाटचाल निरंतर सुरू आहे.

उद्दिष्ट

  • विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधून त्यांना सुसंस्कारित, सशक्त, स्वावलंबी व राष्ट्राभिमानी नागरिक घडविणे. 
  • संस्कार, शिक्षण आणि क्रीडा यांचा समतोल साधत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविणे. 
  • मराठी भाषेच्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगणारे आणि आधुनिकतेशी जुळवून घेणारे विद्यार्थी तयार करणे.
  • समाजासाठी हितकर विचारसरणी असलेल्या कर्तबगार व जबाबदार नागरिकांची पिढी घडविणे.

ध्येय

  • विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक,बौद्धिक विकास होण्यासाठी विशेष प्रयत्न करणे.
  • सांस्कृतिक विकास व्हावा यासाठी विविध सण, उत्सव शाळेत साजरे करून त्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोनाची माहिती सांगणे. 
  • शालेय शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल घडविण्यासाठी प्रेरणादायी व्याख्यानांचे आयोजन करणे.
  • शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी क्रीडा व शारीरिक प्रशिक्षणास प्रोत्साहन देणे. 
  • सुसंस्कृत, राष्ट्राभिमानी व्यक्तिमत्त्व घडवून त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देणे. 
  • पर्यावरण व ई-वेस्ट बाबत जागरूकता वाढवणे, वाचनाची आवड निर्माण करणे.
  • स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मानसिकदृष्ट्या सक्षम करून त्यासाठी मार्गदर्शन करणे.

आम्ही सर्वोत्तम का आहोत?

उत्कृष्ट शैक्षणिक घटक

शाळेतील अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना आव्हानात्मक बनवण्यासाठी , त्यांच्यामध्ये असलेल्या क्षमतांना प्राप्त करण्याकरिता आणि त्यासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेला आहे.

अनुभवी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी

शाळेतील प्रत्येक घटक उत्साही, तंत्रस्नेही, उच्चविद्याविभूषित असून प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध आहेत.

अत्याधुनिक सुविधा

शाळेचा आधुनिक परिसर शिक्षणासाठी पोषक असून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी परिपूर्ण वातावरण मिळण्यास त्यामुळे मदत होते.

पालकांच्या शाळेबद्दलच्या प्रतिक्रिया