विद्यार्थ्यांचे गौरवशाली यश
गार्गी वैद्यला ‘उदयसिंह पाटील सर्वोत्कृष्ट बालकलाकार’ पुरस्काराने सन्मानित!
कु. गार्गी ज्ञानेश वैद्य
Music Prodigy
भरत नाट्य संशोधन मंदिरातर्फे प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठित ‘उदयसिंह पाटील सर्वोत्कृष्ट बालकलाकार’ पुरस्कार गार्गी वैद्य हिला माननीय अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी पु. ल. देशपांडे अकादमीच्या संचालिका मीनल जोगळेकर, रोटरी ३१३१ चे प्रांतपाल नितीन धमाले आणि भरत नाट्य संशोधन मंदिराचे पदाधिकारी उपस्थित होते.
मराठी नाटक आणि विशेषतः संगीत रंगभूमीची आवड जोपासत आपल्या कलागुणांना आकार देणाऱ्या गार्गीसाठी हा पुरस्कार विशेष अभिमानाची बाब आहे. १३३ वर्षांची समृद्ध नाट्यपरंपरा लाभलेल्या भरत नाट्य संशोधन मंदिराकडून मिळालेला हा सन्मान तिच्या कलात्मक वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा आहे.
विशेष अभिमानाची बाब म्हणजे, सलग चौथ्या वर्षी हा पुरस्कार माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या विद्यार्थ्याने पटकावला आहे.
२०२३ – ज्ञानांश कुलकर्णी
२०२४ – सार्थक फडके
२०२५ – रावी पागे
२०२६ – गार्गी वैद्य
गार्गीच्या या यशामागे तिची मेहनत, विविध कलाक्षेत्रांतील मार्गदर्शकांचे प्रोत्साहन, शाळेतील शिक्षकांचे सहकार्य, कुटुंबीयांचे आशीर्वाद आणि रसिकांचे प्रेम यांचा मोलाचा वाटा आहे.
यापूर्वी गार्गीला पुणे मराठी ग्रंथालयातर्फे ‘हरी गणेश फडके बालकलाकार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आता भरत नाट्य संशोधन मंदिराच्या प्रतिष्ठित पुरस्काराने तिच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
गार्गी वैद्यच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन! तिची कलात्मक वाटचाल अशीच बहरत राहो आणि तिच्या हातून मराठी रंगभूमीची उत्तरोत्तर सेवा घडो, हीच सदिच्छा!
पुरस्कार
गार्गी वैद्यला ‘उदयसिंह पाटील सर्वोत्कृष्ट बालकलाक ...
भरत नाट्य संशोधन मंदिरातर्फे प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठित ‘उदयसिंह पाटील सर् ...
सविस्तर वाचा →
१४ वर्षांखालील मुलाच्या आंतरशालेय खो-खो स्पर्धेत त ...
जिल्हा क्रीडा परिषद व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित आंतरश ...
सविस्तर वाचा →
जिल्हास्तरीय आंतरशालेय खो-खो स्पर्धेत घवघवीत यश!
जिल्हा क्रीडा परिषद व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरशाल ...
सविस्तर वाचा →