निसर्ग आपला सोबती
Posted on April 21, 2025
योगिता शिंदे
मुलांनो तुम्ही कधी निसर्गाला भेटला आहात का? त्याच्याशी कधी गप्पा मारल्या का? त्याला होणाऱ्या वेदना,दुःख, याबद्दल त्याच्याशी कधी बोललात का? आपल्याला होणाऱ्या वेदना, दुःख आपण इतरांबरोबर बोलून व्यक्त करतो पण निसर्ग त्याला होणारा वेदना कोणालाही सांगत नाही. तो आपले काम सतत करत असतो.
तुम्हाला एक गंमत सांगते त्यांनाही आपल्यासारख्या भावना असतात. आपण निसर्गाला वेगवेगळ्या पद्धतीने इजा पोहचवतो, परंतु तरी निसर्ग आपल्याला आवश्यक घटक देतोच झाडे आपल्याला हवा, ऑक्सिजन देतात परंतु आपण माणसे प्रदूषण कमी न करता त्यात अजून भर घालत आहोत निसर्गाचा ऱ्हास करत चाललो आहोत.
मुलांनो,तुम्ही जर ठरवले तर निसर्गाचा ऱ्हास कमी करू शकता.तो कसा?प्रदूषण कमी कसे होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. सार्वजनिक ठिकाणे, आपली शाळा ,आपला परिसर, प्रदूषित होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असे जर केले नाही तर पुढील पिढीला निसर्गाचा अनुभव घ्यायला मिळणार नाही म्हणून तुम्ही खूप झाडे लावा त्यांची काळजी घ्या. 'पाणी वाचवा'
निसर्गातील असे अनेक घटक आहेत. त्यांना मानवी गरजांमुळे आपले प्राण गमवावे लागतात.आपण अनेक प्रकारे निसर्गाला इजा पोहचवतो.मला वाटते की निसर्ग आपल्याला इजा करत नाही तर आपणही निसर्गाला इजा का करायची तुम्हाला एक गोष्ट सांगते की आपल्याला कंटाळा आला की आपण एखादा फेरफटका मारून येतो. आपल्याला प्रसन्न,उत्साही वाटते म्हणजेच निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला देखील उत्साही वाटते म्हणूनच आपण आपल्या या सोबती असणाऱ्या निसर्गाचे देखील सोबती बनूया व त्याची होणारी हानी थांबवूया
‘कीटक असो जीव सजीव
पशु पक्ष्यांवर प्रेम करा
निसर्ग हा आपला मित्र खरा
निसर्गाचे धन्यवाद मान’