विद्यार्थ्यांचे गौरवशाली यश

12 व्या राष्ट्रीय INSPIRE-MANAK प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धा (NLEPC) 2026 मध्ये गोळवलकर गुरुजी विद्यालयाची अभिमानास्पद कामगिरी !

12 व्या राष्ट्रीय INSPIRE-MANAK प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धा (NLEPC) 2026 मध्ये गोळवलकर गुरुजी विद्यालयाची अभिमानास्पद कामगिरी !

कु. गीता गणपत धनवडे

कु. गीता गणपत धनवडे

राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत देशभरातील सुमारे 800 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, त्यातून निवड झालेल्या 'सुपर 60' मध्ये महाराष्ट्रातील 7 विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले आहे. यामध्ये गोळवलकर गुरुजी विद्यालयातील गीता गणपत धनवडे या विद्यार्थिनीच्या प्रकल्पाची निवड झाली आहेयाबद्दल तिला (14 ऑक्टोबर) नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते प्रशंसापत्र देऊन गौरविण्यात आले. यापुढे जपान येथे होणाऱ्या शैक्षणिक दौऱ्यासाठीही तिची निवड झाली आहे.
प्रकल्पाचा विषय Ergonomic Bicycle Seat for Enhanced Riding Comfort’ हा होता.

गीता धनवडे ही पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिने विज्ञान प्रदर्शनात सादर केलेल्या नाविन्यपूर्ण प्रयोगाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. तिच्या या यशाबद्दल राज्यभरातून आणि विशेषतः पुणे जिल्ह्यातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

गीताच्या या यशाबद्दल तिचे मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापक, तिच्या पालकांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे. गीताच्या पुढील वैज्ञानिक वाटचालीस आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील सादरीकरणासाठी 'इन्स्पायर मानक योजना' आणि 'राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य' यांच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

पुरस्कार

12 व्या राष्ट्रीय INSPIRE-MANAK प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धा (NLEPC) 2026 मध्ये गोळवलकर गुरुजी विद्यालयाची अभिमानास्पद कामगिरी !

12 व्या राष्ट्रीय INSPIRE-MANAK प्रदर्शन व प्रकल्प ...

राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत देशभरातील सुमारे 800 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला ...

सविस्तर वाचा →
अभिमानास्पद यश!

अभिमानास्पद यश!

17 वर्षाखालील मुलींच्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत आपल्या शाळेतील शमिका ऋषिकेश ...

सविस्तर वाचा →
मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे ...

 शैक्षणिक वर्ष २०२५–२६ च्या इयत्ता सातवी शासन शिष्यवृत्ती परीक्षेत मा. स. गोळवलक ...

सविस्तर वाचा →