विद्यार्थ्यांचे गौरवशाली यश
राज्यात प्रथम क्रमांक पटकावत माजी विद्यार्थ्याने उंचावला विद्यालयाचा मान!
देवाशीष उंब्रजकर
Music Prodigy
पुण्यातील माधव सदाशिव गोवळवलकर गुरुजी विद्यालयाचा माजी विद्यार्थी देवाशीष उंब्रजकर याने टिळक आयुर्वेद महाविद्यालय येथे ‘महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे’ (MUHS) घेण्यात आलेल्या एम.डी. (आयुर्वेद) परीक्षेत ‘द्रव्यगुण विज्ञान’ या विषयात राज्यात प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णयश संपादन केले आहे. या देदीप्यमान यशाबद्दल देवाशीष आणि त्याच्या पालकांवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
देवाशीषचा हा यशाचा आलेख सुरुवातीपासूनच कौतुकास्पद राहिला आहे. त्याने सन २०१२-१३ मध्ये आपली शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) उत्तीर्ण केली. त्यानंतर वैद्यकीय क्षेत्राची निवड करत त्याने टिळक आयुर्वेदिक महाविद्यालयातूनच बी.ए.एम.एस. (BAMS) ही पदवी पूर्ण केली. विशेष म्हणजे, सन २०१९-२० मध्ये बी.ए.एम.एस. च्या अंतिम परीक्षेतही त्याने संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविण्याचा बहुमान मिळवला होता. त्यानंतर आता एम.डी. च्या परीक्षेतही त्याने आपला हा अव्वल येण्याचा सिलसिला कायम राखला आहे.
पणजी आजींची प्रेरणा आणि वैद्यकीय वारसा
देवाशीषला या यशाची प्रेरणा त्याच्या पणजी आजी डॉ. सिंधुताई थत्ते यांच्याकडून मिळाली. डॉ. सिंधुताई या स्वतः बी.ए.एम.एस. डॉक्टर आणि नामवंत गायनाकॉलॉजिस्ट (स्त्रीरोगतज्ज्ञ) होत्या. ज्ञानाची अथांग ओढ असलेल्या सिंधुताईंनी वयाच्या ६० व्या वर्षी संस्कृत विषयातून ‘एम.ए.’ केले होते आणि त्या वयातही त्या विद्यापीठात प्रथम आल्या होत्या. देवाशीषचे पणजोबा देखील डॉक्टर होते. त्यामुळे घरातच वैद्यकीय सेवेचा आणि गुणवत्तेचा मोठा वारसा देवाशीषला लाभला आहे.
शालेय वयापासून आयुर्वेदाकडे असलेल्या त्याच्या ओढ्यामुळे आणि शाळेमध्ये संस्कृतचा उत्तम अध्ययन झाल्यामुळे एमबीबीएस ला ऍडमिशन मिळत असून देखील देवाशीषने बी.ए.एम.एस. ला प्राधान्य दिले. "पणजी आजींचा आदर्श आणि वडिलांचे पाठबळ यामुळेच मी हे यश संपादन करू शकलो. आयुर्वेदाच्या क्षेत्रात अधिकाधिक संशोधन करून रुग्णांची सेवा करणे हेच माझे ध्येय आहे," अशी प्रतिक्रिया या प्रसंगी देवाशीषने दिली. तिसऱ्या पिढीनेही आपल्या पूर्वजांचा हा अभ्यासू आणि कष्टाळू वारसा तेवढ्याच समर्थपणे पुढे चालवल्यामुळे त्याचा त्याच्या परिवाराला आणि विद्यालयाला अभिमान वाटत आहे.
पुरस्कार
12 व्या राष्ट्रीय INSPIRE-MANAK प्रदर्शन व प्रकल्प ...
राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत देशभरातील सुमारे 800 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला ...
सविस्तर वाचा →
अभिमानास्पद यश!
17 वर्षाखालील मुलींच्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत आपल्या शाळेतील शमिका ऋषिकेश ...
सविस्तर वाचा →
मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे ...
शैक्षणिक वर्ष २०२५–२६ च्या इयत्ता सातवी शासन शिष्यवृत्ती परीक्षेत मा. स. गोळवलक ...
सविस्तर वाचा →